Showing posts with label Kavita. Show all posts
Showing posts with label Kavita. Show all posts

Tuesday, 17 February 2015

आईलाही द्यावं कधी माहेरपण - Aai Maherpan Kavita

1


आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच  अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 21 January 2015

काव्य आईस - पत्र रूप

0

एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस
काव्य रूपाने लीहुन पाठविले आहे ते मला आवडले म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवीत आहे.




प्रिय आईस,
पत्ता: देवाचे घर,
तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,
           थापटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधीच,
             तुझी काळजी रात्रभर     
            सतावत राहते उगीच.

तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझ,
             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझ.

वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,
                       काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,
                       का खरंच इतकी कच्ची होती, तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,
                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.

बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,
              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.

भूक लागली तरी
बिलकुल मी रडत नाही,
              कारण मीहसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
                     अंथरुणात लपून,  पुसून डोळे मी गप्पं झोपी जातो.

 बघ तुझं बाळ किती
समजूतदार झाल आहे,
               आणि वय कळण्याआधी 
               वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,
               तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.

 आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,
                  जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.

 मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,
                  ये आता भेटायला    
               नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
           
          पोट भरत ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
           
             मायेची भूक अजून तशीच....
           
             मायेची भूक अजून तशीच....
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते  म्हनुन,,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आनी आईला दु:ख देउ नका !
आवडलच आपल्याला तर वेळ काढुन शेर करा

Share from UR Whatsapp, Click Icon below

© 2014. All rights resevered.