Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Sunday, 8 March 2015

झी मराठी आणी लग्नाच्या अवस्था

0

झी मराठी आणी लग्नाच्या अवस्था..

लग्नाआधी - होणार सुन या घरची...

.लग्नात - जुळुन येतील रेशीमगाठी....

लग्नाच्या 2 महिन्यानंतर -तू तिथे मी....

लग्नाच्या 2 वर्षानंतर - डिटेक्टिव अस्मिता....

लग्नाच्या 5 वर्षानंतर - माझिया प्रियाला प्रित कळेना....

लग्नाच्या 10 वर्षानंतर - का रे दुरावा....

लग्नाच्या 20 वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट....

लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या

😂😂😂

Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 25 February 2015

शासनाचा नविन जमीन अधिग्रहण अध्यादेश.

0

शासनाचा नविन जमीन अधिग्रहण अध्यादेश.

१) शेतकरयांची जमिन त्यांना कोनतीही पुर्वसूचना न देता अधग्रहन करण्याचा शासनास अधिकार.

२) याविरूद्ध दाद मागण्याचा अधिकार नाही, याबाबद कोणत्याही न्यायालयात सुनावनी होणार नाही.

३) मिळनारा मोबदला संबधित उद्योगसमुह ठरवनार.
आता तुम्हीच सांगा हे उद्योगसमुह किती मोबदला देतील?

४) न्यायालयात दाद मागण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागनार.
  परवानगी द्यावी कि नाही हे शासन ठरवनार ???

५) बागायती जमीनही घेता येणार.

६) ५ वर्ष विकास न केल्यास जमीन मुळ मालकास परत करन्याचे कलम जे पुर्वीच्या शासनाने मान्य केले ते वगळण्यात आले.

७) अधिग्रहीत जमीन संबधीत समुहास विक्री करता येणार.

अजुन खुप काही अन्यायी तरतुदी. ज्या "इंग्रज व रजाकार"  यांच्या काळात पण नव्हत्या.
ग
  हेच का अच्छे दिन.

आपल्या देशाची सर्व जमीन काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात घालन्याचा हा डाव आहे.

    पटल्यास आपल्या ग्रुप वर share करा व ग्रुप वर Shame  हा शब्द पाठवा.
   
     बघुयात ५६ इंचाच्या छातीत शेतकरयांसाठी ह्रदय आहे का?

केवळ भाषणातच भारतभूमीला माता म्हनायचे मते मिळवायची सत्ता आली  कि तिच माता उद्योगपतींच्या घशात घालायची.
 

      ......एक शेतकरी

Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 18 February 2015

Let's Celebrate Shiva Jayanti - शिवजयंती च्या सर्व शिवभक्तांना शिव शुभेच्छा !!!!

0


प्रौढ प्रताप पुरंदर..गोब्राम्हण प्रतिपालक..
क्षत्रिय कुलवतंसक..सिंहासनाधिश्वर..
हिंदवी स्वराज्य संस्थापक..
राजाधिराज योगिराज..पुरंधराधिष्पती..
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज कि जय ।।


अंगनामधे तुळस, शिखरावरती कळस,
हिच तर आमच्या महराष्ट्राची ओळख...
सान्ड्लेल्या रक्तात सुध्दा सापडनार नाही काळोख
"शिवभक्त" आहोत हिच आमची ओळख.....

शिवजयंती च्या सर्व शिवभक्तांना शिव शुभेच्छा !!!!


Share from UR Whatsapp, Click Icon below

Tuesday, 17 February 2015

आईलाही द्यावं कधी माहेरपण - Aai Maherpan Kavita

1


आईलाही द्यावं कधी माहेरपण

कबूल आहे तिचंच असतं घर
पण आईलाही द्यावं कधी माहेरपण ..

उठू दे तिला कधी सर्वात शेवटी
पाण्याची वेळ असो वा बाईची सुट्टी
नको तिला छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

कर म्हणावं आज तुझ्या आवडीची भाजी
फार नाही, पुरेल तिला मदत जराशी
लक्षात ठेवून तिची आवड आणि नावड पण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

द्यावा कधी चहा तिला सकाळी उठून
सांगावं मनातलं काही जवळ बसून
ऐकावं तिचंही होऊन मोठं आपण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

आई राहून सासरी लेकीला माहेर देते
पण लेकीच्या हे लक्ष्यात कधी येते?
जेव्हा ओसरतात तिचेही नवलाईचे क्षण
मग आईला कुठलं माहेरपण?

तिला ओळखणारं तिचंच  अंगण
समजुतदारपणावर विश्वासालेल मोकळेपण
शरीर मनाला विसाव्याचे क्षण
आईलाही हवं असेल का माहेरपण?

आईलाही हवा असेल कधी विसावा
वाटेल, समजुतीचा हात तिच्या हाती असावा
ज्या हातांना तिनेच लावलंय वळण
आईलाही द्यावं कधी माहेरपण

Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 11 February 2015

पुणेरी पेठेत घडलेला किस्सा....

0
पुणेरी पेठेत घडलेला किस्सा....
     एका मशिदीजवळ एक पाणीपुरी वाला पाणीपुरी विकत उभा होता चार काँलेज तरुणी पाणीपुरी खात होत्या ....
      मशिदीतून एक मुसलमान  म्हतारा बाहेर आला. रस्ता ओलांडायचा होता त्याला ......पण गडबडीत रिक्षा च्या आडून आलेला दुचाकीस्वार लक्षात आला नसावा...मोटारसायकलच्या धक्क्याने म्हतारा कोलमडून पडला , मोटारसायकलच्याच मागे वीस बाविस वयाचा एक मुलगा सायकलवर येत होता.....
   सायकल वर पार्सल ची पिशवी बहुधा डिलिव्हरी बाँय असावा..अंगात जर्किन ..त्यावर छातीच्या डावीकडे ..छत्रपतींचा देखणा , रुबाबदार फोटो.
   त्याने त्या वृध्दाला पडताना पाहिले...आणि क्षणार्धात त्याने पिशवीसहीत सायकल रोडवर सोडून दिली..सायकल , पिशवी रोडवर पडली ...
    धावत जाऊन त्याने त्या वृध्दाला उठवले , त्याचे कपडे झटकले..त्याला रोड पार करुन दिला. मग परत येऊन पिशवी , सायकल उचलली व आपल्या रस्त्याने निघून गेला....
.
      हे सर्व पाहून त्या चौघींपैकी एक जी बहुतेक मराठा असावी...तीच्या तोंडून आपसूक बाहेर पडलं...."हा खरा माझ्या राजांचा मावळा "....हे ऐकून तिघी हसल्या आणि एक म्हणाली ," लग्न करशील त्याच्याशी "
      हे ऐकून पहिली मुलीने सुरेख उत्तर दिलं...म्हणाली , " का ? काय वाईट आहे...बापकमाईची गाडी फिरवत नाही..कष्ट करुन पोट भरतो...माझ्या राजाचा मावळा आहे म्हणून मुसलमान वृध्दाला मदत केली इतकी माणुसकी..,
१४ फेब्रुवारी ला गुलाब हातात घेऊन दरवर्षी नवीन मुलगी शोधत फिरणार् या माकडांपेक्षा असा मुलगा कधीही चांगलाच !!"
   कौतुक वाटलं ....मुलीचं नाही तिच्या आईबाबांचे ज्यांनी तिला हे पारखण्याची नजर दिली..
मित्रांनो आपण आपल्या गाडीवर , जर्किन्सवर छत्रपतींचा फोटो घेतो पण महाराजांना शोभणारे वर्तन...., ते जमत नसेल तर महाराजांना गाडीवर अंगावर मिरवू नका....
महाराजांची इज्जत कमी करु नका
  आभारी आहे

Pls vacha mitrano

Share from UR Whatsapp, Click Icon below

Friday, 6 February 2015

Joke - एक मोटारसायकल स्वार आला आणि सिग्नल तोडून

0

वेळ: सकाळी ९:३० ची. स्थळ: जे.एम रस्ता, पुणे. बंड्या सिग्नलवर थांबला होता. अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार आला आणि सिग्नल तोडून पुढे निघून गेला. त्याला पाहून अजुन २-३ जण सिग्नल तोडून पुढे निघाले. बंड्याला वाटले इतके जण सिग्नल तोडून निघाले मग आपणही जाऊया. पुढे गेल्यावर त्या सगळ्यांना वाहतुक पोलीसांनी पकडले. अर्थात बंड्यालाही पकडले. पोलीसांनी नियमभंगाखाली सगळ्यांनाच दंड आकारला. पण ती जी पहिली व्यक्ती होती ज्याने सिग्नल तोडला होता त्याच्याकडून दंड घेतला नाही, उलट त्याला काही पैसे दिले. हा प्रकार पाहून बंड्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या पोलीसाला विचारले,"काय हो साहेब, तुम्ही आम्हां सगळ्यांकडून पैसे घेतले. पण त्या व्यक्ती कडून काहीच न घेता उलट त्याला पैसे दिले. असं का?" तेव्हा तो पोलीस म्हणाला: ज्या मानसानं शिग्नल तोडला, त्यो आमचांच मानुस हाय. आता त्यो परत फिरुन यिल, शिग्नल तोडील आनि तुझ्यासारखी येडी लोकं त्याच्या माग येतील. मार्च एंड जवळ आलाय, आम्हाला पण टार्गेट हाय बाबा. . निघ आता तु. चल..

Share from UR Whatsapp, Click Icon below

Tuesday, 3 February 2015

Be the CEO of your Life

0

Be the CEO of your own Life ...
बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...
दोन दिवसांपूर्वीची गोष्ट. कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो. मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खरं तर, नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो.असो.)
माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीशीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट. अंगावर ब्रुट. हातात मराठी पुस्तक. खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला,’वाचन आवडतं?’
‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.’ आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.
‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही. इच्छा झाली की वाचतो.’ अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.
‘खायला आवडतं?’ कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.
‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’
‘हो? मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’
‘नाही नाही…रोज दोन वेळा..आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच.’ हिट विकेट !
तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण..तसंच वाचन !’
‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’ दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
‘वेळ मिळत नाही. मी काढतो. ‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! ‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणारे’ असं कोणी म्हटलं ना, की माझी खात्री आहे, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ हसत असेल !’ मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’
मी आणखी हसू लागलो.
‘आय अॅम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला ? मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाशझोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन. मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.
माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस ! तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’
‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं.
‘साफ चूक ! माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’
‘मी समजलो नाही.’
‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून !
या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो. मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही ! मृत्यू म्हणजे – आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या ‘अन्याया’विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो. म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’. या पुढे एकेका घासाचा मजा घ्यायचा. आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’
‘म्हणजे नक्की काय केलं?’माझी उत्सुकता आता वाढली होती.
‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’
‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे…जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.
‘वेल…तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते’ केलेत. त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.
‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला. ‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो. दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.
माझ्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा…..’
माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.
हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.
मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !
घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !
प्रत्येकाने वाचावा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख

Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 21 January 2015

काव्य आईस - पत्र रूप

0

एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस
काव्य रूपाने लीहुन पाठविले आहे ते मला आवडले म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवीत आहे.




प्रिय आईस,
पत्ता: देवाचे घर,
तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,
           थापटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधीच,
             तुझी काळजी रात्रभर     
            सतावत राहते उगीच.

तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझ,
             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझ.

वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,
                       काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,
                       का खरंच इतकी कच्ची होती, तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,
                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.

बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,
              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.

भूक लागली तरी
बिलकुल मी रडत नाही,
              कारण मीहसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
                     अंथरुणात लपून,  पुसून डोळे मी गप्पं झोपी जातो.

 बघ तुझं बाळ किती
समजूतदार झाल आहे,
               आणि वय कळण्याआधी 
               वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,
               तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.

 आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,
                  जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.

 मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,
                  ये आता भेटायला    
               नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
           
          पोट भरत ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
           
             मायेची भूक अजून तशीच....
           
             मायेची भूक अजून तशीच....
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते  म्हनुन,,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आनी आईला दु:ख देउ नका !
आवडलच आपल्याला तर वेळ काढुन शेर करा

Share from UR Whatsapp, Click Icon below

Monday, 5 January 2015

मुंबई मेरी जान : How places got their names? Interesting

0
भायखळा : ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते भाया भायाचे खळे ते भायखळे
आणि त्याचा झाला भायखळा.

परळ : या ठिकाणी पुष्कळ परळीची झाडे होती म्हणून या गावाला परळ नाव पडले.

दादर : मुंबई बेटाच्या उत्तरेला वसलेले गाव. ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे, म्हणून चढाच्या या भागाला नाव पडले दादर. वरचा मजला गाठण्याचा जिना म्हणजे दादर.

माटुंगा : मातंग स्थान म्हणजे हत्ती ठेवण्याचे ठिकाण! यावरून माटुंगा हे नाव आले.असं म्हणतात की, या ठिकाणी भीमदेव राजाचे हत्ती ठेवले जात असत.



नायगाव : हा भाग ‘न्याय-ग्राम’ या शब्दावरून आलेला आहे या ठिकाणी राजा भीमदेवाचे
न्यायालय आणि राजवाडा होता न्याय मिळण्याचे ठिकाण ते न्याय न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश नायगाव.

बोरीबंदर : हे नाव १८५२ साली तेथपर्यंत असलेले समुद्रावरील बंदर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली बोरींची झाडे यावरून पडले.

ग्रँट रोड, रे रोड मुंबईतल्या सुमारे पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरांची नावे दिलेली आहेत उदा लॅमिंग्टन रोड, आर्थर रोड, नेपियन सी रोड, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड, हॉर्नबी रोड, रे रोड, कुलाब्याचा वुड हाऊस रोड वगैरे.

चर्नी रोड : या भागात पुष्कळ गवत होते आणि गाई-म्हशी इथे चरत असत त्यांची चरणी ती चर्नी !

नळबाजार : शहरातील सांडपाण्याचे मुख्य गटार जिथून वाहत जाऊन वरळीच्या समुद्राला मिळत होते तो भाग नळबाजार म्हटला जाऊ लागला आता नळबाजार कुठे आणि वरळी कुठे? पण त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने एकमेकांना जोडलेले होते.

अँटॉप हिल : अँटॉप ही जागा अंतोबा नावाच्या कोळ्याची होती यावर कुणाचा विश्वास बसेल काय? सायबाने अंतोबाचा अँटॉप केला आणि त्यावरून अँटॉप हिल नाव रूढ झाले.

डोंगरी : हे नाव सरळसरळ डोंगरावरून आले आहे हा भाग तेव्हा संपूर्ण डोंगराळ होता.

कांदेवाडी : गिरगावातील कांदेवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गोदामांनी आणले.

लोहार चाळ : हे नाव तेथे असणार्या लोखंडी सामानाच्या केवळ एका दुकानावरून पडले.

प्रत्येक मुंबईकराने शेयर केलच पाहिजे

॥ जरा हटके जरा बचकेये है मुंबई मेरी जान ॥

Share from UR Whatsapp, Click Icon below

Monday, 29 December 2014

फोटो काढून Whatsapp वर टाकायचा आणि नंतरच खायचे

0
वडील श्रीखंड घेऊन येतात.
मुलगा लगेच डबा उघडायला जातो,
इतक्यात आईचे लक्ष जाते.

 त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते
"किती वेळा सांगितले....
आधी ....
.
.
.
.
.
.




फोटो काढून Whatsapp वर टाकायचा आणि नंतरच खायचे" 😂😄😝😂😜

Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 17 December 2014

Good Morning - शुभ-सकाळ

0
हा पहाटेचा मंद मंद वारा..
त्यामध्ये रात-राणीचा परीमळ
सारा..मनाला माझ्या स्पर्शुन
गेला..जणु काही सांगुन गेला..

त्यामध्ये ते कोकिळेचे गीत
माझे चित्त झाले पुलकित...

उगवेल हा सुर्य आज फक्त
तुमच्यासाठी..सार्या मनीच्या
इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..

अशी सुंदर सकाळ रोजच
जिवनी यावी...तुमच्या प्रसन्न
चित्तानेती अशी खुलुन यावी..

हा दिवस तुम्हा सर्वांना
खुप खुप आनंदाचा जावो..

शुभ-सकाळ..

Share from UR Whatsapp, Click Icon below

Sunday, 14 December 2014

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा

0
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा ।

शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोsस्तु ते ।
दिव्या दिव्या दिपोत्कार कानी कुंडले मोतीहार
दिव्याला देखुन नमस्कार ॥१॥

ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा जळो मध्यान्घरात ।
दिवा लागला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार गोपाळकृष्णापाशी ॥२॥

दीपज्योति: परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापं
संध्यादीप नमोsस्तु ते ॥३॥
अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणां च पराभवम्‌ ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥४॥




Share from UR Whatsapp, Click Icon below

Wednesday, 10 December 2014

IMP: Health Tips लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

0
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम...

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, कडधान्य, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, सुशी, मासे, मट्ण, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..


लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..

या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ॲड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..

तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

डॉ. विकास बाबा आमटे.. आनंदवन..

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋. Please forward to as many as possible --

Share from UR Whatsapp, Click Icon below

Tuesday, 9 December 2014

Why Kohli Picked all Sharmas in first Test?

0
Kohli's first Test as Captain & Picked all Sharma
Rohit Sharma
Karan Sharma
Ishant Sharma.
Bcoz Of ‪#‎Anushka Sharma‬
मेव्हणे... मेव्हणे... मेव्हण्यांचे पाव्हणे.... 

Share from UR Whatsapp, Click Icon below

© 2014. All rights resevered.