आचार्य अत्रे आणि आग्र्याहून सुटका...
अत्र्यांच्या शालेय जीवनातली ऐकीव घटना. शाळेच्या स्नेहसंमेलनात "आग्र्याहून सुटका" हे नाटक करायचं होता. अत्र्यांना शिवाजीची भूमिका करायची होती. काही दिवस तालमी झाल्या आणि नंतर अचानक शाळेच्या विश्वस्तांचा नातेवाईक असलेला एक जरा नाकी डोळी चांगला असलेला मुलगा शिवाजीची भूमिका करणार असं हेडमास्तरांनी सांगितलं. अत्रे अर्थातच हिरमुसले झाले. "मग निदान कोणतीतरी दुसरी भूमिका द्या अशी विनंती त्यांनी हेडमास्तरांना केली...हो नाही करत दारावरच्या पहारेकर्याची भूमिका अत्र्यांना मिळाली आणि मग पुढे तालमी झाल्या.
ठरलेल्या दिवशी प्रत्यक्ष नाटक सुरु झाल....(आता पुढचा प्रसंग डोळ्यासमोर आणा.....)
पहिला पेटारा भोई घेऊन आले....अत्रे म्हणाले.."क्या हैं इसमे?"
भोई "मिठाई हैं"
अत्रे "जाने दो"..(वस्तुतः हा पेटारा उघडून तपासायचा होता).....भोई गांगरले....अत्रे म्हणाले "सुना नाही क्या, चलो निकलो"
दुसरा पेटारा आला...तिसरा पेटारा आला..हे दोन्ही पेटारे पण उघडून तपासायचे होते...
अत्रे "क्या हैं इन दोनो में? "
भोई "दवाइया हैं"..."फल हैं"..
अत्रे, "चलो जाने दो...कुछ देखना नही हैं".....तिकडे विंगेतून मास्तर खाणाखुणा करतायत त्या कडे अत्र्यांच मुद्दाम दुर्लक्ष...
आता चौथा आणि फायनल पेटारा...त्यात महाराज लपलेले...हा पेटारा न तपासता तसाच सोडायचा होता...
पण.....
अत्रे , "ठेहरो, क्या हैं इसमे"..
एक भोई जीवात जीव आणून...."वोह...वोह...मिठाई हैं"
अत्रे, "अच्छ, मिठाई हैं?...चलो खोलके दिखाव...".....(असं काही ठरलेलं नव्हतं)
भोयांना तो पेटारा खाली ठेवून अत्रे स्वतः उघडतात....आत महाराज !!!
अत्रे..."क्या रे शिवाजी? पहाड का चुवा...भाग जाता हैं क्या?..चल चुपचाप अंदर..चाल"...असं म्हणून महाराजांना चक्क कानाला धरून पेटाऱ्यातून उठवून पुन्हा महालात घेवून जातात.....
...आणि “आग्र्याहून सुटके”च्या त्या प्रयोगाला प्रचंड "हशा आणि टाळ्या"...😄😄😄
Share from UR Whatsapp, Click Icon below
0 comments:
Post a Comment