थर्टीफर्स्टला तळीरामांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची: मुंबई पोलीस
मुंबई: थर्टीफर्स्टच्या रात्री एकाद्या व्यक्तींन टल्ली होईपर्यंत मद्यपान केलं तर त्याला घरापर्यंत सोडणं ही बारमालकाची जाबाबदारी असणार आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक परिपत्र काढलं आहे. अपघाताची
मालिका कमी व्हावी यासाठी हा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
यासंदर्भातलं परित्रक लवकरच बारमालकांना मिळण्याची शक्यता आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वगातासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मात्र सेलिब्रेशनच्या रात्री अपघात होऊ नये म्हणून पोलिसांनी ही विशेष काळजी घेतली आहे.
महत्वाचं म्हणजे या परिपत्रकाचं रेस्टोरंट मालकांनीही स्वागत केलं आहे. तसंच पोलिसांना पुरेपुर सहकार्य करणार असल्याचंही रेस्टॉरंट मालकांनी सांगितलं आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी लोकांचा उत्साह दांडगा असतो.
मद्यधुंद चालकांवर नियंत्रण ठेवणंदेखील पोलिसांसमोरचं महत्वाचं आव्हान आहे. पण आता यावर तोडगा काढण्यासाठी पोलिसांनी रेस्टॉरंट मालकांवरही जबाबदारी टाकली आहे. मुंबई पोलिसांच्या या निर्णयामुळे अपघात टाळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Share from UR Whatsapp, Click Icon below
0 comments:
Post a Comment