Saturday, 6 December 2014

Filled Under: , ,

Heart Attack Care हृदयविकार आणि उपायांसंदर्भात केलेले मार्गदर्शन...

मित्रांनो, काळजीपूर्वक वाचा आपल्या हृदयाविषयी...
बंगळुरू येथील प्रसिद्ध नारायणा हृदयालय रुग्णालयाचे प्रमुख डॉ. देवी शेट्टी यांच्याशी विप्रो येथील कर्मचार्‍यांनी हृदयविकार आणि त्यासंबंधी घ्यावयाच्या उपायांसंदर्भात केलेले मार्गदर्शन...
प्र. - हृदयाची काळजी कशी घ्यावी?
उ. - १) योग्य खान-पान, कमी कार्बोहाड्रेटस, जास्त प्रोटीन आणि कमी तेल. २) आठवड्यातून किमान अर्धा तास चालणे, लिफ्टचा वापर न करणे, एका ठिकाणी जास्त वेळ बसू नये. ३) स्मोकिंग बंद करावी. ४) वजन नियंत्रणात ठेवणे. ५) बी. पी. (ब्लडप्रेशर) आणि शुगर नियंत्रणात ठेवणे.
प्र. - नॉनव्हेजमध्ये मासे हृदयासाठी चांगले असतात का?
उ. - नाही
प्र. - एखाद्या तंदरुस्त व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका का येतो?
उ. याला सायलेंट अटॅक म्हणतात. त्यामुळे वय वर्षे ३० नंतर नियमित चेकअप करावे.
प्र. - हृदयविकार हा अनुवंशिक आजार आहे का?
उ. - होय!
प्र. - हृदयावरील तणाव कमी करण्यासाठी काय केले पाहिजे.
उ. - आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे असा अट्टाहास करू नये.
प्र. -  चालणे चांगले की जॉगिंग? जिममध्ये व्यायाम केल्यास हृदयासाठी चांगले असते का?
उ. - चालणे कधीही चांगलेच. जॉगिंंगमुळे शरीराच्या जॉईंट्सना इजा पोहोचू शकते.
प्र. - कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होतो का?
उ. - शक्यता फारच कमी.
प्र. - कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रक्रिया कधी होते. ३० वर्षांनंतर कोलेस्ट्रॉलची काळजी घ्यावी का?
उ. - शरीरात लहानपणापासूनच कोलेस्ट्रॉल असते.
प्र. - अनियमित खाण्यामुळे हृदयावर काय परिणाम होतो.
उ. - अनियमित खात असा आणि त्यातही जंकफूड असेल तर पचनसंस्थेमध्येच गडबड होते.
प्र. - औषध न घेता कोलेस्ट्रॉल कसा नियंत्रणात आणावा?
उ. - खाण्यावर नियंत्रण, नियमित चालणे आणि आक्रोड खाणे.
प्र. - हृदयासाठी कोणते अन्न चांगले आणि वाईट आहे?
उ. - फळे आणि भाज्या हृदयासाठी चांगल्या. तेल सर्वांत वाईट.
प्र. - कोणते तेल चांगले? सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन, ऑलिव्ह ऑईल?
उ. - सवर्च तेल वाईट.
प्र. - नियमित वैद्यकीय तपासणी म्हणजे काय?
उ. - वय वर्षे ३० नंतर सहा महिन्यांतून एकदा रक्त तपास करवी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल, बी.पी. चेक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रेड मील आणि इको टेस्ट करावी.
प्र. - हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार काय करावेत?
उ. - त्या रुग्णाला तत्काळ झोपवावे, त्याच्या जिभेखालच्या बाजूला ऍस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी ठेवावी. वेळ न दवडता आणि ऍम्ब्युलन्सची वाट न पाहता जवळच्या हृदयविकार रुग्णालयात तत्काळ घेऊन जावे. बहुतांशी मृत्यू पहिल्या एक तासात होतात.
प्र. - ऍसिडीटी, गॅसेसमुळे छातीत होणारी जळजळ आणि हृदयविकाराचा त्रास हे कसे ओळखावेत?
उ. - डॉक्टरांकडे जाऊन ई.सी.जी. केल्याशिवाय हे समजणे कठीण आहे.
प्र. - तरुणांमध्ये ३० ते ४० वर्षांच्या आत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढले आहे?
उ. - चुकीची लाईफस्टाईल, स्मोकिंग, जंकफूड, व्यायामाचा अभाव यामुळे अमेरिका आणि युरोपपेक्षा तीनपट जास्त हृदयविकाराचे रुग्ण हिंदुस्थानात आहेत.
प्र. - अनेकांचे जीवनमान दगदगीचे आहे. अनेकांना रात्रपाळी करावी लागते. त्याचा परिणाम हृदयावर होतो का?
उ. - जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा निसर्ग रक्षण करीत असतो. परंतु जसजसे वय वाढत जाते, तसा शरीरराचाही आपण आदर केला पाहिजे. यात बदल हवा.
प्र. - जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न केल्यामुळे जन्मलेल्या मुलाला हृदयाचा काही आजार असू शकतो का?
उ. - होय! काही प्रमाणात मुलांमध्ये ही लक्षणे दिसू शकतात.
प्र. - उच्च रक्तदाब म्हणजे बी. पी. (ब्लडप्रेशर) नियंत्रित ठेवण्यासाठी घेण्यात येणार्‍या औषधांचे साईड इफेक्ट दिसतात का?
उ. - होय! अनेक औषधांचे साईड इफेक्ट असतात. मात्र, सध्या अनेक सुधारणा झाल्यामुळे आधुनिक औषधे अधिक चांगली आहेत.
प्र. - जास्त चहा, कॉफी घेतल्यामुळे हार्टऍटॅक येतो का?
उ. - नाही!
प्र. - अस्थमाचा आजार आणि हृदयविकाराचा काही संबंध आहे का?
उ. - नाही!
प्र. - केळी खाल्ल्यामुळे बी. पी. नियंत्रणात येतो का?
उ. - नाही!
प्र. - जंकफूड म्हणजे काय?
उ. - फ्राईड केलेेले मॅकडोनल्डस आणि तत्सम ठिकाणी बनविले जाणारे अन्न, समोसा आणि मसाला डोसाही.
प्र. - नियमित चालण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि एकाच जागी खूप वेळ बसून काम करावे लागत असेल तर काय करावे?
उ. - एकाच जागी तासाभरापेक्षा जास्त वेळ बसू नये. जागेवरच थोडा वेळ उभे राहावे किंवा एका खुर्चीवरून दुसर्‍या खुर्चीवर बसले तरीही चालते, पण आठवड्यातून पाच दिवस किमान अर्धा तास चालल्यास उत्तमच!
टीप : मित्रांनो, आजपर्यंत आपण विनोद, वात्रटिका, कविता, शेरोशायरी तसेच काही पांचट विनोद वाचून हसून मजा केली; परंतु आपल्या स्वत:च्या शरीराबद्दल आपण कधीच विचार केला नाही. तरी हा मेसेज वाचताना तुमचे पाच ते दहा मिनिटे नक्कीच गेले असतील. परंतु हा मेसेज वाचल्यामुळे माझ्या मित्रांनाच काय, सर्वांनाच याचा फायदा होईल.
(कृपया यात कोणीही काहीही बदल करु नये वरील सर्व माहिती सत्य आहे)

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.