Monday, 5 January 2015

Filled Under: , ,

मुंबई मेरी जान : How places got their names? Interesting

भायखळा : ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते भाया भायाचे खळे ते भायखळे
आणि त्याचा झाला भायखळा.

परळ : या ठिकाणी पुष्कळ परळीची झाडे होती म्हणून या गावाला परळ नाव पडले.

दादर : मुंबई बेटाच्या उत्तरेला वसलेले गाव. ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे, म्हणून चढाच्या या भागाला नाव पडले दादर. वरचा मजला गाठण्याचा जिना म्हणजे दादर.

माटुंगा : मातंग स्थान म्हणजे हत्ती ठेवण्याचे ठिकाण! यावरून माटुंगा हे नाव आले.असं म्हणतात की, या ठिकाणी भीमदेव राजाचे हत्ती ठेवले जात असत.



नायगाव : हा भाग ‘न्याय-ग्राम’ या शब्दावरून आलेला आहे या ठिकाणी राजा भीमदेवाचे
न्यायालय आणि राजवाडा होता न्याय मिळण्याचे ठिकाण ते न्याय न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश नायगाव.

बोरीबंदर : हे नाव १८५२ साली तेथपर्यंत असलेले समुद्रावरील बंदर आणि त्याच्या आजूबाजूला असलेली बोरींची झाडे यावरून पडले.

ग्रँट रोड, रे रोड मुंबईतल्या सुमारे पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरांची नावे दिलेली आहेत उदा लॅमिंग्टन रोड, आर्थर रोड, नेपियन सी रोड, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड, हॉर्नबी रोड, रे रोड, कुलाब्याचा वुड हाऊस रोड वगैरे.

चर्नी रोड : या भागात पुष्कळ गवत होते आणि गाई-म्हशी इथे चरत असत त्यांची चरणी ती चर्नी !

नळबाजार : शहरातील सांडपाण्याचे मुख्य गटार जिथून वाहत जाऊन वरळीच्या समुद्राला मिळत होते तो भाग नळबाजार म्हटला जाऊ लागला आता नळबाजार कुठे आणि वरळी कुठे? पण त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने एकमेकांना जोडलेले होते.

अँटॉप हिल : अँटॉप ही जागा अंतोबा नावाच्या कोळ्याची होती यावर कुणाचा विश्वास बसेल काय? सायबाने अंतोबाचा अँटॉप केला आणि त्यावरून अँटॉप हिल नाव रूढ झाले.

डोंगरी : हे नाव सरळसरळ डोंगरावरून आले आहे हा भाग तेव्हा संपूर्ण डोंगराळ होता.

कांदेवाडी : गिरगावातील कांदेवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गोदामांनी आणले.

लोहार चाळ : हे नाव तेथे असणार्या लोखंडी सामानाच्या केवळ एका दुकानावरून पडले.

प्रत्येक मुंबईकराने शेयर केलच पाहिजे

॥ जरा हटके जरा बचकेये है मुंबई मेरी जान ॥

Share from UR Whatsapp, Click Icon below


Share/Bookmark

All Latest Message, Joke, News, Images portal for Whatsapp, Hike, Line Mesaages to share. Explore all happening interesting stuff here

0 comments:

Post a Comment

© 2014. All rights resevered.