वेळ: सकाळी ९:३० ची.
स्थळ: जे.एम रस्ता, पुणे.
बंड्या सिग्नलवर थांबला होता.
अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार आला आणि सिग्नल तोडून पुढे निघून गेला. त्याला पाहून अजुन २-३ जण सिग्नल तोडून पुढे निघाले. बंड्याला वाटले इतके जण सिग्नल तोडून निघाले मग आपणही जाऊया.
पुढे गेल्यावर त्या सगळ्यांना वाहतुक पोलीसांनी पकडले. अर्थात बंड्यालाही पकडले. पोलीसांनी नियमभंगाखाली सगळ्यांनाच दंड आकारला. पण ती जी पहिली व्यक्ती होती ज्याने सिग्नल तोडला होता त्याच्याकडून दंड घेतला नाही, उलट त्याला काही पैसे दिले.
हा प्रकार पाहून बंड्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या पोलीसाला विचारले,"काय हो साहेब, तुम्ही आम्हां सगळ्यांकडून पैसे घेतले. पण त्या व्यक्ती कडून काहीच न घेता उलट त्याला पैसे दिले. असं का?"
तेव्हा तो पोलीस म्हणाला: ज्या मानसानं शिग्नल तोडला, त्यो आमचांच मानुस हाय. आता त्यो परत फिरुन यिल, शिग्नल तोडील आनि तुझ्यासारखी येडी लोकं त्याच्या माग येतील.
मार्च एंड जवळ आलाय, आम्हाला पण टार्गेट हाय बाबा.
.
निघ आता तु. चल..
Share from UR Whatsapp, Click Icon below
0 comments:
Post a Comment